बालुशाही आणि ऑरेंज संदेश (S...

बालुशाही आणि ऑरेंज संदेश (Sweet Delites : Balushahi And Sandesh)

बालुशाही


साहित्य : 1 वाटी मैदा, 4 चमचे रवा, अर्धा वाटी दूध, 2 चमचे साजूक तूप, 1 वाटी साखर, पाव चमचा केशर, 1 चमचा वेलची पावडर, पाव चमचा खाण्याचा सोडा.

कृती : सर्वप्रथम दूध, खाण्याचा सोडा एकत्र करून त्यामध्ये मैदा आणि रवा भिजवा. त्यात अर्धा लिंबू पिळून चांगलं मळून घ्या. नंतर त्याच्या छोट्या पेढ्यासारख्या बाट्या बनवून, त्या साजूक तुपावर मंद आचेवर तळा. साखरेचा पाक तयार करून, त्यात ही बालुशाही पाच मिनिटं बुडवून ठेवा. उरलेला पाक घट्ट करून तो पुन्हा बालुशाहीवर घाला आणि सर्व्ह करा.

 

ऑरेंज संदेशसाहित्य : अर्धा किलो पनीर, अर्धा वाटी साखरेचे क्यूब, 1 वाटी संत्र्याचा रस, पाव चमचा ऑरेंज इसेन्स, 2 चमचे तूप, सजावटीकरिता चांदीचा वर्ख.

कृती : अर्धा किलो पनीर मिक्सरमधून फिरवून घ्या. साखरेचे क्यूब बराच वेळ संत्र्याच्या रसावर घोळवा, म्हणजे संत्र्याचा स्वाद आणि रंग येईल. त्यानंतर साखरेचे सगळे क्यूब कुटून घ्या. साखर, पनीर आणि संत्र्याचा रस एकत्र करून मंद गॅसवर चांगले परता. कडेने मिश्रण सुटत आल्यानंतर त्यात थोडा ऑरेंज इसेन्स आणि रंग घाला. मिश्रण पुन्हा चांगलं ढवळून तूप लावलेल्या ट्रेमध्ये ओता. मिश्रण थंड होऊन सेट झाल्यानंतर, त्याच्या वड्या पाडा. त्यावर चांदीचा वर्ख लावून सर्व्ह करा.

  • विष्णू मनोहर