हैग्रीव (Sweet Delite Of Chana And Moog Dal)

हैग्रीव (Sweet Delite Of Chana And Moog Dal)

हैग्रीवसाहित्य :
1 वाटी चणा डाळ, अर्धा वाटी मूग डाळ, दीड वाटी गूळ, 2 टीस्पून खसखस, अर्धा वाटी किसलेलं सुकं खोबरं, 2 टीस्पून साजूक तूप, थोडे काजू, बदाम व बेदाणे, स्वादानुसार जायफळ पूड.
कृती : चणा डाळ आणि मूग डाळ स्वच्छ धुऊन कुकरमधून मऊ शिजवून घ्या. नंतर चाळणीवर उपसून पाणी निथळून घ्या. खसखस आणि खोबर्‍याचा कीस कोरडाच भाजून, मिक्सरमधून बारीक करून घ्या. काजू आणि बदामाचे काप करून, चमचाभर तुपात तळून घ्या. बेदाणेही त्यात तळून घ्या.
शिजवलेली डाळ आणि गूळ एकत्र करून चांगली घोटून घ्या. गरज वाटल्यास त्यात थोडं डाळीचं पाणी घालून मंद आचेवर शिजत ठेवा. त्यात खसखस-खोबर्‍याचं मिश्रण, काजू-बदाम काप आणि बेदाणे घाला. गूळ विरघळल्यावर त्यात जायफळ पूड घालून मिश्रण व्यवस्थित एकत्र करा. हैग्रीव शिर्‍यासारखं घट्ट असायला हवं. गरमागरम हैग्रीववर साजूक घालून वाढा.