अननस-खजूर पाक (Sweet Delight : Pineapple Khajoo...

अननस-खजूर पाक (Sweet Delight : Pineapple Khajoor Slice)

अननस-खजूर पाकसाहित्य :
अर्धा अननस (तुकडे केलेला), 150 ग्रॅम खजूर, 100 ग्रॅम मावा, 2 टेबलस्पून मलई, 1 टेबलस्पून तूप, 1 कप साखरेचा दाट पाक, 5-6 बदाम (बारीक केलेले), पाव कप काजूची पूड.

कृती : अननस आणि खजूर दोन्ही वेगवेगळे बारीक वाटून घ्या. त्यात समप्रमाणात साखरेचा पाक एकत्र करून थोडा वेळ बाजूला ठेवा. कढईमध्ये तूप गरम करून त्यात अननस आणि खजूर वेगवेगळे चांगले परतवून घ्या. नंतर ते एकत्र करून, त्यात मावा आणि मलई घालून परतवा. शेवटी काजू पूड घालून एकत्र करा. थाळी किंवा ट्रेला तुपाचा हात लावून त्यात हे मिश्रण घाला. वरून बदामाचे तुकडे पसरवा. मिश्रण साधारण थंड झालं की, त्याच्या वड्या पाडा.