कतली दिवा (Sweet Cashew Lamp)

कतली दिवा (Sweet Cashew Lamp)

कतली दिवा

साहित्य : 2 वाट्या अख्खे काजू किंवा काजू पावडर, 4 चमचे मनुका, 5 चमचे पिस्ते, 10-12 बदाम, 2 वाट्या साखर, 1 चमचा गुलकंद, पाव वाटी मिल्क पावडर.
कृती : सर्वप्रथम काजू भिजवून त्याची पेस्ट करून घ्या. नॉनस्टिक पॅनमध्ये पेस्ट चांगली परतून घ्या. त्याचा घट्ट गोळा होत आल्यावर त्यात गुलकंद आणि साखर घालून गोळा करून ठेवा. नंतर या गोळ्याचे समान भाग करून त्याच्या वाट्या तयार करा. मनुका, पिस्ते, बदाम बारीक चिरून, त्यात थोडी मिल्क पावडर घालून मिश्रण तयार करा. हे मिश्रण तयार वाट्यांमध्ये भरा. बदामाचे काप करून त्याला वातीचा आकार द्या. त्यावरून मध घालून सर्व्ह करा.
– विष्णू मनोहर