कैरीची आंबट-गोड चटणी (Sweet And Sour Chutney OF...

कैरीची आंबट-गोड चटणी (Sweet And Sour Chutney OF Raw Mango)

कैरीची आंबट-गोड चटणी

 

साहित्य : 1 मध्यम आकाराची कैरी, अर्धा कप किसलेला गूळ, 2 टेबलस्पून साखर, 1 टीस्पून लाल मिरची पूड, अर्धा टीस्पून भाजलेली जिरेपूड, स्वादानुसार मीठ.

कृती :
कैरी स्वच्छ धुऊन, उकडून घ्या. नंतर कैरीचं साल आणि कोय काढून टाका. कैरीच्या गरात, गूळ, मिरची पूड, जिरेपूड आणि मीठ एकत्र करा. हे मिश्रण नॉनस्टिक पॅनमध्ये मंद आचेवर सतत ढवळत शिजत ठेवा. मिश्रण दाट आणि चकचकीत व्हायला हवं. नंतर त्यात आवश्यकतेनुसार साखर मिसळा. मिश्रण चांगलं एकजीव करून मिनिटभर शिजवा आणि आच बंद करा. कैरीची आंबट-गोड चटणी गरमागरम किंवा थंड करून सर्व्ह करा.

टीप :
* कैरीच्या आंबटपणानुसार साखरेचं प्रमाण कमीजास्त करा.
* चटणी पूर्णतः थंड करून, स्वच्छ कोरड्या काचेच्या बरणीत भरून फ्रीजमध्ये ठेवल्यास काही दिवस चांगली टिकते.