सुरळीच्या वड्या (Suralichya Vadya)
सुरळीच्या वड्या (Suralichya Vadya)

सुरळीच्या वड्या
साहित्यः 1 कप शिंगाड्याचे पीठ, अर्धा कप दही, 1 कप पाणी, 1 टीस्पून तेल, चवीनुसार मीठ. फोडणीसाठी 2 टेबलस्पून तेल, 2 टीस्पून, ओले किसलेले खोबरे, पांढरे भाजलेले तीळ, 2 मिरच्या, बारीक चिरलेली कोथिंबिर.
कृतीः एका भांड्यात शिंगाड्याचे पीठ, दही व पाणी एकत्र करा. पिठाच्या गुठळ्या मोडून पीठ एकजीव होईपर्यंत ढवळा. एका नॉनस्टिक पॅनमध्ये तेल गरम करून हे मिश्रण ढवळा. हे मिश्रण पॅनची कडा सोडेपर्यंत सतत ढवळत राहून शिजवून घ्या. एका ताटाला उलट्याबाजूने थेडे तेल लावून तयार मिश्रण त्यावर ओता गरम असतानाच पलीत्याच्या साहायाने पसरवा. खोबरे, तीळ, मिरची व कोथिंबिर एकत्र करून सारण तयार करा. हे सारण पसरवलेल्या शिंगाड्याच्या मिश्रणावर घाला. आता ह्याचे सुरीने काप करून रोल करा. कोथिंबिरीने सजवून सर्व्ह करा.