व्हेज नूडल्स पनीर बॉल (Sunday Special : Veg Noo...

व्हेज नूडल्स पनीर बॉल (Sunday Special : Veg Noodles Paneer Ball)

साहित्य : अर्धा कप किसलेला गाजर, अर्धा कप किसलेला कोबी, 1 कप किसलेला पनीर, 2 टीस्पून हिरवी मिरचीची पेस्ट, अर्धा टीस्पून लसणाची पेस्ट, अर्धा कप मैदा, थोडे क्रश केलेले हाका नूडल्स किंवा राइस नूडल्स, तळण्यासाठी ते, स्वादानुसार मीठ.
कृती : गाजर, कोबी, पनीर, हिरवी मिरचीची पेस्ट, लसणाची पेस्ट आणि मीठ यांचं एकजीव मिश्रण तयार करा. या मिश्रणाचे 10 गोळे तयार करा. मैद्यात अर्धा कप पाणी मिसळून दाट मिश्रण तयार करा. हे गोळे सर्वप्रथम मैद्याच्या मिश्रणात घोळवून, नंतर नूडल्सच्या चुर्‍यात घोळवा. तेल गरम करून त्यात हे गोळे सोनेरी रंगाचे होईपर्यंत तळून घ्या. गरमागरम व्हेज नूडल्स पनीर बॉल शेजवान सॉससोबत सर्व्ह करा.