शुफ्ता (Sunday Special : Shukta-Dry Fruit Mix)

शुफ्ता (Sunday Special : Shukta-Dry Fruit Mix)

शुफ्ता


साहित्य : पाव वाटी बदाम, पाव वाटी काजू, पाव वाटी मनुका, पाव वाटी पिस्ता, पाव वाटी अक्रोड, पाव वाटी खजूर, पाव वाटी सुक्या खोबर्‍याचे तुकडे, पाव वाटी पनीर,
दीड वाटी साखर, अर्धा वाटी तूप, अर्धा टीस्पून जायफळ पूड, अर्धा टीस्पून गुलाबाच्या पाकळ्या, अर्धा टीस्पून काळी मिरी पूड, अर्धा टीस्पून वेलची पूड, अर्धा टीस्पून सुंठ पूड,
अर्धा टीस्पून केशर पूड.

कृती : सुका मेवा जाडसर चिरून एकत्र करून ठेवा. सुकं खोबरं आणि पनीरचेही साधारण त्याच आकाराचे तुकडे करा. नॉनस्टिक पॅनमध्ये तूप गरम करून, त्यात पनीर आणि सुक्या खोबर्‍याचे तुकडे तळून बाजूला ठेवून द्या. उर्वरित तुपात सुकामेव्याचे तुकडे घालून, खमंग सुगंध येईपर्यंत चांगले परतवून घ्या. नंतर त्यात साखर आणि वेलची-जायफळ पूड, गुलाबाच्या पाकळ्या, काळी मिरी पूड, सुंठ पूड आणि केशर घाला. त्यात खोबरं आणि पनीर घालून साखर विरघळेपर्यंत मिश्रण सतत ढवळत राहा. नंतर आच बंद करून मिश्रण गरमागरम सर्व्ह करा.
टीप : शुफ्ता फ्रीजमध्ये ठेवल्यास सात दिवस चांगला टिकतो. मात्र शुफ्ता फ्रीजमध्ये ठेवत असाल, तर सर्व्ह करण्यापूर्वी थोडा गरम करा.