सातपडी रोटी विथ मँगो पिकल अँड सांभार (Sunday Sp...

सातपडी रोटी विथ मँगो पिकल अँड सांभार (Sunday Special: Seven Folds Roti With Mango Pickle And Sambhar)

सातपडी रोटी विथ मँगो पिकल अँड सांभार

साहित्य : रोटीसाठी : 100 ग्रॅम गव्हाचं पीठ, 1 ग्रॅम मीठ, 3 ग्रॅम लसूण, 1 ग्रॅम लाल मिरची पूड, 1 ग्रॅम सांभार मसाला, 5 ग्रॅम तूप.
लोणच्यासाठी : 1 कैरी, 1 ग्रॅम मीठ, 1 ग्रॅम लाल मिरची पूड, 2 ग्रॅम तेल.

कृती : गव्हाचं पीठ आणि तूप एकत्र करून त्यात मीठ व पाणी घालून व्यवस्थित मळून घ्या. सांभार मसाला, लसूण पेस्ट, लाल मिरची पूड आणि तूप यांचं एकजीव मिश्रण तयार करा. पिठाचा गोळा लाटून त्यावर थोडं सांभाराचं मिश्रण चोळा आणि घडी करून जरा लाटा. पुन्हा त्यावर थोडं सांभाराचं मिश्रण चोळून घडी करा आणि थोडं लाटा. अशा प्रकारे सात वेळा करा. नंतर त्याची पोळी लाटून गरम तव्यावर व्यवस्थित शेकून घ्या. कैरी बारीक चिरून त्यात लोणच्यासाठीचं उर्वरित साहित्य एकत्र करा. गरमागरम सातपडी रोटी ताज्या कैरीच्या लोणच्यासोबत सर्व्ह करा.