चंदनाचं सरबत (Sunday Special: Sandle Sarbat)

चंदनाचं सरबत (Sunday Special: Sandle Sarbat)

चंदनाचं सरबत

 

साहित्य : 125 ग्रॅम चंदनाचा चुरा, 2 किलो साखर, अर्धा चमचा सायट्रिक अ‍ॅसिड, 1 ते दीड ग्रॅम केशर, 200 मिलिलीटर गुलाबपाणी.

कृती : चंदनाचा चुरा 2 लीटर पाण्यामध्ये किमान एक दिवस भिजत ठेवा. नंतर हे पाणी आटून कमीत कमी दीड लीटर होईस्तोवर उकळा. पुन्हा हे पाणी एक दिवस तसंच राहू द्या. भांड्यात खाली चंदनाचा थर जमल्यावर, वरील पाणी अलगद काढून घ्या. आता या पाण्यात साखर घालून पाक करण्यासाठी ठेवा. साखर विरघळल्यानंतर त्यात सायट्रिक अ‍ॅसिड घालून साखरेवरची मळी काढून टाका. या मिश्रणाचा दोन तारी पाक तयार करून, मलमलच्या कापडाने गाळून घ्या. पाक थंड करत ठेवा. गुलाबपाण्यामध्ये केशर उगाळून, ते पाकामध्ये एकत्र करा. हे मिश्रण हवाबंद बाटलीमध्ये भरून ठेवा.

लाभ : चंदनाचं सरबत सुगंधित आणि तनामनाला शांती व शीतलता प्रदान करणारं आहे.