कैरीचा भात (Sunday Special: Raw Mango Rice)

कैरीचा भात (Sunday Special: Raw Mango Rice)

कैरीचा भात

साहित्य : 2 कप तांदूळ, 1 कप कैरीचा कीस, 2 टेबलस्पून तेल, 1 टीस्पून मोहरी, 1 टेबलस्पून चणा डाळ, 1 टेबलस्पून उडीद डाळ, 2 सुक्या काश्मिरी मिरच्या, 2 हिरव्या मिरच्या,
3 टेबलस्पून शेंगदाणे, 12-15 कढीपत्ते, पाव टीस्पून हिंग, अर्धा टीस्पून हळद, स्वादानुसार मीठ, सजावटीसाठी थोडी बारीक चिरलेली कोथिंबीर आणि खोवलेलं खोबरं.

कृती : तांदूळ शिजवून घ्या. काश्मिरी मिरच्यांचे मध्यम आकाराचे तुकडे करून घ्या. हिरव्या मिरच्यांना मधून उभी चिर द्या. नॉनस्टिक कढईमध्ये तेल गरम करून, त्यात मोहरी, चणा डाळ, उडीद डाळ, काश्मिरी मिरचीचे तुकडे, हिरव्या मिरच्या, शेंगदाणे आणि कढीपत्ते घालून मध्यम आचेवर साधारण तीन-चार मिनिटं परतवा. नंतर त्यात हिंग आणि हळद मिसळून परतवा. आता त्यात कैरीचा कीस, 2 टेबलस्पून पाणी आणि मीठ मिसळून मिश्रण चांगलं एकजीव करा. झाकण लावून मध्यम आचेवर चार-पाच मिनिटं शिजवा. अधूनमधून मिश्रण ढवळत राहा. नंतर त्यात भात घालून हलक्या हाताने मिश्रण एकजीव करा. झाकण लावून मध्यम आचेवर दोन मिनिटं शिजवा. गरमागरम कैरीचा भात कोथिंबीर आणि खोबरं घालून सजवा आणि सर्व्ह करा.