पनीर कॉर्न चीज बॉल्स (Sunday Special: Paneer Co...

पनीर कॉर्न चीज बॉल्स (Sunday Special: Paneer Corn cheese balls)

पनीर कॉर्न चीज बॉल्ससाहित्य :
200 ग्रॅम कुस्करलेलं पनीर, 100 ग्रॅम अमेरिकन कॉर्न (मक्याचे मोठे दाणे), 150 ग्रॅम किसलेलं चीज, 2 चिमूट पांढरी मिरी पूड, 10 ग्रॅम ओव्याची पानं (बारीक चिरलेली),
50 ग्रॅम कॉर्नफ्लोअर, 50 ग्रॅम ब्रेडचा चुरा, 100 ग्रॅम उकडलेले बटाटे, स्वादानुसार मीठ, तळण्याकरिता तेल.

कृती : पनीर, चीज, बटाटे आणि मक्याचे दाणे व्यवस्थित एकत्र करून घ्या. या मिश्रणात ओव्याची पानं, पांढरी मिरी पूड, ब्रेडचा चुरा, कॉर्नफ्लोअर आणि मीठ घालून एकजीव मिश्रण तयार करून घ्या. या मिश्रणाचे लहान लहान गोळे तयार करून गरम तेलात सोनेरी रंगावर तळून घ्या. गरमागरम पनीर कॉर्न चीज बॉल्स चिली सॉससोबत सर्व्ह करा.