मूर्ग मसल्लम (Sunday Special: Moorg Mussallam)

मूर्ग मसल्लम (Sunday Special: Moorg Mussallam)

मूर्ग मसल्लम

साहित्य : अर्धा किलो चिकन, अर्धा टीस्पून जायफळ पूड, 3 लवंगा, अर्धा टेबलस्पून आलं पेस्ट, 1 टेबलस्पून कांद्याची पेस्ट, स्वादानुसार लाल मिरची पूड, 2 टेबलस्पून घट्ट दही, 2 हिरव्या मिरच्या बारीक चिरलेल्या, अर्धा टेबलस्पून गरम मसाला पूड, 1 टेबलस्पून धणे पूड, 2 वेलच्या, 1 दालचिनीची काडी, अर्धा टेबलस्पून लसणाची पेस्ट, अर्धा टेबलस्पून हिरव्या मिरचीची पेस्ट, आवश्यकतेनुसार हळद, 4 टेबलस्पून तेल, 3 कांदे बारीक चिरलेले, बारीक चिरलेली कोथिंबीर.
कृती : चिकनचे मध्यम आकाराचे तुकडे करून, स्वच्छ धुऊन निथळून घ्या. जायफळ पूड, वेलची, लवंगा, दालचिनी, 1 टीस्पून जिरं यामध्ये थोडं पाणी घालून बारीक वाटून घ्या. त्यात आलं-लसूण पेस्ट, कांद्याची पेस्ट, हिरव्या मिरचीची पेस्ट, मिरची पूड, गरम मसाला पूड, धणे पूड व हळद एकजीव करा. त्यात दही, थोडं तेल व मीठ एकत्र करा. शेवटी त्यात चिकनचे तुकडे घालून किमान तासभर मॅरिनेट करण्यासाठी ठेवून द्या. दुसर्‍या भांड्यात उर्वरित तेल गरम करून त्यात मध्यम आचेवर जिरं, तमालपत्र आणि हिरव्या मिरच्या परतवा. त्यात कांदा घालून सोनेरी रंगावर परतवा. त्यात मॅरिनेट केलेलं चिकन घालून तेल सुटेपर्यंत परतवा. आवश्यकता असल्यास थोडं पाणी आणि मीठ एकत्र करून झाकण लावून चिकन शिजवा. गरमागरम मूर्ग मसल्लम कोथिंबीर घालून सर्व्ह करा.