मावा श्रीखंड रोल (Sunday Special : Mawa Shrikha...

मावा श्रीखंड रोल (Sunday Special : Mawa Shrikhand Roll)

मावा श्रीखंड रोल

साहित्य : 1 कप मावा, अर्धा कप श्रीखंड, 1 टेबलस्पून वेलची पूड, 1 टेबलस्पून काजू पूड, 1 टेबलस्पून किसलेलं खोबरं, 2 टेबलस्पून पिस्त्याची पूड.

कृती : कढईत मावा घालून मंद आचेवर पाच ते दहा मिनिटं परतवून घ्या. नंतर तो थंड होऊ द्या. मावा थंड झाल्यावर व्यवस्थित मळा आणि त्याचा एक गोळा तयार करा. हा गोळा लाटून, चौकोनी आकारात कापून घ्या. आता माव्याच्या पोळीवर श्रीखंड पसरवा. त्यावर काजू-पिस्त्याची पूड, खोबरं पसरवून, अलगद दाबून रोल तयार करा. रोलवर वेलची पूड भुरभुरा. हे रोल 10 मिनिटं फ्रीजमध्ये थंड होण्यासाठी ठेवा. रोल थोडे कडक झाले की, फ्रीजमधून बाहेर काढा आणि त्याचे साधारण 2 इंच लांबीचे रोल कापा.

टीप :
* श्रीखंड शिल्लक राहिलं की, वेगळं काहीतरी म्हणून असा मावा श्रीखंड रोल तयार करता येईल.
* हा रोल तयार करताना वेगळेपणा म्हणून, मावा भाजल्यानंतर त्यात सर्व साहित्य एकजीव करून रोल तयार करता येईल किंवा मावा भाजल्यानंतर मावा सोडून उर्वरित सर्व साहित्य एकजीव करून, ते माव्याच्या पोळीवर पसरवून रोल तयार करता येईल.