मँगो शेवया खीर (Sunday Special: Mango Sewaiya K...

मँगो शेवया खीर (Sunday Special: Mango Sewaiya Kheer)

मँगो शेवया खीर

साहित्य : 500 ग्रॅम दूध, 30 ग्रॅम शेवया, 1 हापूस आंबा, 50 ग्रॅम साखर, 5 ग्रॅम तूप, 2 ग्रॅम वेलची पूड, 10 ग्रॅम काजू, 10 ग्रॅम मनुका.
कृती : तुपामध्ये शेवया परतवून घ्या आणि बाजूला ठेवून द्या. दूध व्यवस्थित गरम करून घ्या. त्यामध्ये साखर एकत्र करा. साखर विरघळल्यावर त्यात शेवया घालून, शिजवून घ्या. नंतर त्या हापूस आंब्याचा रस, काजू, मनुका आणि वेलची पूड घाला. सर्व मिश्रण व्यवस्थित शिजल्यावर आच बंद करून ते थंड होऊ द्या. सामान्य तापमानात आल्यावर तासाभरासाठी फ्रीजमध्ये ठेवा. मँगो शेवया खीर थंडगार सर्व्ह करा.