लिचीचं सरबत (Sunday Special: Litchi Sarbat)

लिचीचं सरबत (Sunday Special: Litchi Sarbat)

लिचीचं सरबत

साहित्य : अर्धा किलो लिचीचा गर, अर्धा किलो साखर, अर्धा टीस्पून सायट्रिक अ‍ॅसिड, अर्धा टीस्पून सोडियम बेन्झोएट.

कृती : लिचीचा गर मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्या. नंतर गाळणीने गाळून घ्या. साखरेमध्ये अर्धा लीटर पाणी घालून पाक तयार करण्यासाठी गॅसवर उकळत ठेवा. साखर विरघळल्यानंतर त्यात पाण्यामध्ये सायट्रिक अ‍ॅसिडचा घोळ तयार करून तो घाला. त्यानंतर वर जमलेली मळी चमच्याने काढून टाका आणि पाक गाळून घ्या. त्यात लिचीचं पाणी मिसळून दोन तारी पाक तयार करा. पाक थंड झाल्यावर दोन चमचे सरबतामध्ये सोडियम बेन्झोएट मिसळून ते पुन्हा सरबतामध्ये एकत्र करा. हे मिश्रण हवाबंद बाटलीमध्ये भरून ठेवा.