इटालियन कॉफी मूस (Sunday Special: Italian Coffe...

इटालियन कॉफी मूस (Sunday Special: Italian Coffee Moose)

इटालियन कॉफी मूस

Italian Coffee Moose

साहित्य : 4 टीस्पून चायना ग्रास, 1 टीस्पून इंस्टंट कॉफी, 1 टीस्पून साखर, 1 टीस्पून मध, 100 ग्रॅम फेटलेली फ्रेश क्रीम.

कृती : 125 मिलिलीटर थंड पाण्यात चायना ग्रास तासभर भिजत ठेवा. नंतर मंद आचेवर चायना ग्रास विरघळेपर्यंत शिजवा. त्यात कॉफी आणि साखर मिसळा. नंतर मिश्रण गाळून घेऊन, त्यात मध मिसळा. मिश्रण आचेवरून खाली उतरवा आणि थंड होऊ द्या. मिश्रण दाट झाल्यावर त्यात फ्रेश क्रीम मिसळा. इटालियन कॉफी मूस सर्व्हिंग ग्लासमध्ये भरून त्यावर कॉफी भुरभुरा आणि सर्व्ह करा.