फ्रूट मॉकटेल (Sunday Special : Fruit Mocktail)

फ्रूट मॉकटेल (Sunday Special : Fruit Mocktail)

फ्रूट मॉकटेलसाहित्य :
1 कप स्ट्रॉबेरी, 1 कप केळ्याचे तुकडे, 1 कप काळी द्राक्षं, 1 कप अननसाचे तुकडे, 2 कप साखर, पाव कप लिंबाचा रस, 1 टेबलस्पून आल्याचा रस, बर्फाचा चुरा, सजावटीसाठी काही स्ट्रॉबेरीचे तुकडे आणि अननसाच्या चकत्या.

कृती : सर्व फळांचे तुकडे, साखर आणि बर्फ एकत्र मिक्सरमध्ये फिरवून घ्या. त्यात लिंबाचा आणि आल्याचा रस एकत्र करून पुन्हा मिक्सरमध्ये फिरवा. हे मिश्रण सर्व्हिंग ग्लासमध्ये भरून त्यात स्ट्रॉबेरीचे तुकडे व अननसाची चकती ठेवून सजवा आणि थंडगार फ्रूट मॉकटेल सर्व्ह करा.