सुकामेव्याचा हलवा (Sunday Special : Dry Fruit ...

सुकामेव्याचा हलवा (Sunday Special : Dry Fruit Halwa)

सुकामेव्याचा हलवा

साहित्य : 1 कप रात्रभर भिजवलेले बदाम, 1 कप रात्रभर भिजवलेले काजू, 1 कप साखर, अर्धा कप दूध, 4 केशराच्या काड्या, 1 टीस्पून तूप.

कृती : बदामाची सालं काढून टाका. बदाम आणि काजू मिक्सरमधून बारीक वाटून घ्या. आवश्यकता भासल्यास त्यात थोडं दूध घाला. एक टीस्पून दुधात केशराच्या काड्या भिजत ठेवा. आता जाड बुडाच्या भांड्यात हे मिश्रण सतत ढवळत परतवा. मिश्रण सोनेरी रंगाचं झालं की, त्यात साखर, तूप आणि केशराचं मिश्रण घालून दाट होईपर्यंत परतवा. मिश्रण सतत ढवळत राहा. मिश्रण दाट झालं की, तुपाचा हात लावलेल्या ताटात किंवा ट्रेमध्ये ओता. मिश्रण सारखं करून त्याच्या वड्या पाडा. त्यावर काजू-बदामाचे पातळ काप पसरवून सजवा आणि सर्व्ह करा.