ढाबा चिकन करी (Sunday Special: Dhaaba Chicken C...

ढाबा चिकन करी (Sunday Special: Dhaaba Chicken Curry)

ढाबा चिकन करी


साहित्य : पाव किलो चिकन, पाव कप कांद्याची पेस्ट, अर्धा कप टोमॅटोची पेस्ट, 1 टेबलस्पून आलं-लसूण पेस्ट, पाव टीस्पून हळद, 1 टीस्पून लाल मिरची
पूड, अर्धा टीस्पून जिरे पूड, 1 टीस्पून गरम मसाला, 2 टेबलस्पून घट्ट दही, स्वादानुसार मीठ, 1 दालचिनीची काडी, 2 लवंगा, 1 तमालपत्र, अर्धा टीस्पून बडीशेप, 4-5 टेबलस्पून तेल.
कृती : चिकनचे मध्यम आकाराचे तुकडे करून, स्वच्छ धुवा आणि निथळून घ्या. चिकनला हळद चोळून 20 मिनिटं मॅरिनेट करण्यासाठी ठेवा. 20 मिनिटांनंतर चिकन पुन्हा धुऊन घ्या.
आता एका जाड बुडाच्या भांड्यामध्ये तेल गरम करून त्यात लवंगा, दालचिनी, तमालपत्र आणि बडीशेप घालून परतवून घ्या. मसाल्यांचा खमंग सुगंध आला की, त्यात कांदा आणि आलं-लसणाची पेस्ट घालून मिनिटभर परतवा. नंतर त्यात टोमॅटो प्युरी घालून परतवा. त्यात चिकन आणि फेटलेलं दही एकत्र करा. त्यात लाल मिरची पूड, धणे पूड, गरम मसाला आणि मीठ एकत्र करा. हे मिश्रण झाकण लावून मंद आचेवर 10-15 मिनिटं शिजवा. मिश्रणाला तेल सुटू लागलं की, आच बंद करा आणि कोथिंबीर घालून गरमागरम चिकन करी सर्व्ह करा.