कॉर्न बिर्याणी (Sunday Special: Corn Biryani)

कॉर्न बिर्याणी (Sunday Special: Corn Biryani)

कॉर्न बिर्याणी


साहित्य : अर्धा कप उकडलेले मक्याचे दाणे, 100 ग्रॅम बेबी कॉर्न, 200 ग्रॅम शिजवलेला भात, 1 बारीक चिरलेला टोमॅटो, 1 बारीक चिरलेला कांदा, 1 बारीक चिरलेली सिमला मिरची, 1 टेबलस्पून बिर्याणी मसाला, 1 टेबलस्पून आलं-लसूण पेस्ट, स्वादानुसार मीठ, 4 टेबलस्पून बटर, 4 बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या, बारीक चिरलेली कोथिंबीर.

कृती : एका पॅनमध्ये बटर गरम करून त्यात कांदा, आलं-लसूण पेस्ट घालून परतवा. नंतर हिरवी मिरची आणि बेबी कॉर्न घालून परतवा. त्यानंतर त्यात टोमॅटो, सिमला मिरची आणि पाव कप पाणी घालून बेबी कॉर्न नरम होईपर्यंत शिजवा. बेबी कॉर्न नरम झाल्यावर त्यात शिजवलेला भात, मीठ, बिर्याणी मसाला आणि मक्याचे दाणे घालून एकत्र करा आणि 5 मिनिटं शिजवा. वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घालून कॉर्न बिर्याणी सजवा आणि गरमागरम सर्व्ह करा.