मिसळ पाव (Sunday Special Breakfast : Misal Paav)

मिसळ पाव (Sunday Special Breakfast : Misal Paav)

साहित्य : 2 कप मोड आलेलं मिश्र कडधान्यं, 3 बटाटे तासून बारीक चिरलेले, 2 कांदे बारीक चिरलेले, 2 हिरव्या मिरच्या बारीक चिरलेल्या, 1 इंच आलं किसलेलं, 2 लसणाच्या पाकळ्या किसलेल्या, 1 टीस्पून मोहरी, 1 टीस्पून जिरं, 8-10 कढीपत्ते, 1 टेबलस्पून गोडा मसाला, 1 टीस्पून हळद, 1 टेबलस्पून काश्मिरी लाल मिरची पूड, 1 टीस्पून धणे पूड, 1 टीस्पून जिरं पूड, 2 टेबलस्पून तेल, 1 कप चिंचेचा कोळ, स्वादानुसार मीठ.
इतर : 1 कांदा बारीक चिरलेला, पाव कप फरसाण, 1 लिंबू, थोडी बारीक चिरलेली कोथिंबीर.
कृती : कुकरमध्ये कडधान्य, बटाटे, लाल मिरची पूड, मीठ, हळद आणि पाव कप पाणी घालून तीन शिट्या होईपर्यंत शिजवा. नंतर मंद आचेवर पाच मिनिटं शिजवा आणि आच बंद करा. कुकर थंड होऊ द्या. आता एका कढईत तेल गरम करून त्यात मोहरी आणि जिर्‍याची फोडणी करा. मोहरी तडतडली की, त्यात कांदा, हिरवी मिरची, आलं, लसूण आणि कढीपत्ते घालून कांदा पारदर्शक होईपर्यंत परतवा. नंतर त्यात गोडा मसाला, हळद, मिरची पूड, धणे पूड आणि जिरं पूड घालून काही सेकंद परतवा. आता त्यात शिजवलेलं कडधान्यं-बटाट्याचं मिश्रण मिसळा. कढईतच हे मॅशरच्या साहाय्याने साधारण कुस्करून घ्या. मिश्रण मध्यम आचेवर पाच मिनिटं शिजू द्या. त्यात चिंचेचा कोळ मिसळून एक उकळी आणा. आच मंद करून दहा मिनिटं शिजवा. गरमागरम मिसळीवर कोथिंबीर घालून सर्व्हिंग बाऊलमध्ये घाला. डिशमध्ये सोबत कांदा, फरसाण, लिंबाची फोड आणि पाव ठेवून सर्व्ह करा.

मिसळ पाव, Sunday Special Breakfast, Misal Paav

खट्टा मीठा राइस (Khatta Meetha Rice)