काश्मिरी वडा (Sunday Special Breakfast: Kashmir...

काश्मिरी वडा (Sunday Special Breakfast: Kashmiri Vada)

काश्मिरी वडा

काश्मिरी वडा, Sunday Special Breakfast, Kashmiri Vada

साहित्य : 1 कप उकडून कुस्करलेले मटार, अर्धा कप मावा, 2 बटाटे उकडून कुस्करलेले, पाव कप पुदिन्याची पानं बारीक चिरलेली, 1 अननसाची चकती बारीक चिरलेली, 2 टेबलस्पून कोथिंबीर बारीक चिरलेली, 2-3 टेबलस्पून बदामाचे काप, 2 टेबलस्पून पिस्त्याचे काप, 1 टीस्पून गरम मसाला, 2 टेबलस्पून डेसिकेटेड कोकोनट, 2 टेबलस्पून कसुरी मेथी, पाव कप भाजलेलं बेसन, 1 टेबलस्पून आलं-मिरची पेस्ट, एका लिंबाचा रस, स्वादानुसार मीठ, तळण्यासाठी तेल.

कृती :
एका वाडग्यात तेलाव्यतिरिक्त सर्व साहित्य घेऊन व्यवस्थित एकजीव करून घ्या. या मिश्रणाच्या चपट्या वड्या तयार करा. कढईत तेल गरम करून वडे सोनेरी रंगावर तळून घ्या. गरमागरम काश्मिरी वडे हिरव्या चटणीसोबत सर्व्ह करा.