अंगुरी रबडी (Sunday Special: Angoori Rabadi)

अंगुरी रबडी (Sunday Special: Angoori Rabadi)

अंगुरी रबडी

साहित्य : 1 कप ताजा चक्का (स्मॅश केलेला), दीड लीटर दूध, दीड कप साखर, अर्धा कप मिश्र सुकामेवा, चिमूटभर केशर (2 टेबलस्पून दुधामध्ये एकत्र केलेलं), 2 टीस्पून केशर-वेलची सिरप, 1-2 थेंब खाण्याचा नारिंगी रंग.

कृती : चक्क्यामध्ये नारिंगी रंग एकत्र करून त्याचे लहान लहान गोळे तयार करून घ्या. एका पॅनमध्ये 3 कप पाणी आणि अर्धा कप साखर एकत्र करून मोठ्या आचेवर सतत ढवळत राहा. अशा प्रकारे साखरेचा पाक तयार करून घ्या. या पाकात एकेक करून चक्क्याचे गोळे घाला आणि 15 मिनिटं उकळवा. नंतर आचेवरून उतरवून थंड होऊ द्या.
रबडी बनवण्यासाठी एका पॅनमध्ये दूध गरम करत ठेवून त्याचं प्रमाण अर्ध होईपर्यंत उकळवा. त्यात केशराचं दूध, उर्वरित साखर, केशर-वेलची सिरप आणि सुकामेवा घालून साखर विरघळेपर्यंत शिजू द्या. नंतर रबडी आचेवरून उतरवा. अंगुरी चक्क्याच्या गोळ्यांना दाबून त्यातील साखरेचा पाक काढून घ्या. एका बाऊलमध्ये
हे चक्क्याचे गोळे घालून त्यावर रबडीचं मिश्रण घाला. वरून सुकामेव्याचे काप घालून सजवा आणि दोन तासांकरिता सेट होण्यासाठी फ्रीजमध्ये ठेवून द्या.
नंतर थंडगार अंगुरी रबडी सर्व्ह करा.