ऑर्गेनिक मधाचे केशर श्रीखंड (Sunday Feast : Saf...

ऑर्गेनिक मधाचे केशर श्रीखंड (Sunday Feast : Saffron Shrikhand In Organic Honey)

ऑर्गेनिक मधाचे केशर श्रीखंड

श्रीखंड हे सगळ्यांच्या आवडीचे स्वादिष्ट, मलईदार मिष्टान्न आहे. हे श्रीखंड अधिक रुचकर बनविण्यासाठी तुम्ही अझफ्रानचे वाइल्ड फॉरेस्ट ऑर्गेनिक हनी वापरा. हे मध आरोग्यदायी व सेंद्रिय असल्याने या गोड पदार्थाची चव वाढवतानाच तुमचे उत्तम आरोग्य राखते.

ऑगेर्निक मधाचे केशर श्रीखंड

साहित्य :

२ कप दही

१/२ चमचा अझफ्रान वाइल्ड फॉरेस्ट ऑर्गेनिक हनी

२ चमचे केशराचे पाणी

१/२ चमचा वेलची पावडर

१० पिस्ता (चिरलेले)

 

कृती :

एका मोठ्या भांड्यात मलमलचे कापड पसरवा. त्यामध्ये २ कप घरी तयार केलेले दही टाका. तुम्ही दुकानातून घेतलेले दही पण वापरू शकता. दही घातलेले कापड बांधा व ते टांगून ठेवा.

२ तास किंवा पाणी पूर्ण खाली येईपर्यंत ते सुकू द्या. दही आंबट होऊ नये म्हणून रेफ्रिजरेट करा. त्याने दही घट्ट व मलईदार होते. आता हे हँग दही एका मोठ्या भांड्यात घ्या व चांगले मिसळा. अर्धा कप पिठीसाखर, २ चमचे केशर पाणी आणि अर्धा चमचा वेलची पावडर टाका. तसेच ऑर्गेनिक मध टाका. या सर्व साहित्याचे चांगले मिश्रण करा.

शेवटी १० चिरलेल्या पिस्त्यासह सजवा आणि स्वादिष्ट श्रीखंड सर्व्ह करा.