ऑरेंज बॉल्स (Sunday Feast : Orange Balls)

ऑरेंज बॉल्स (Sunday Feast : Orange Balls)

ऑरेंज बॉल्स


साहित्य : 5-6 संत्री, अर्धा लीटर दूध, 1 टेबलस्पून क्रीम, 150 ग्रॅम साखर, 2 थेंब ऑरेंज इसेन्स, 1 टेबलस्पून मनुका, 1 टेबलस्पून डाळिंबाचे दाणे.

कृती : संत्र्याच्या वरच्या बाजूच्या सालाची चकती काढून घ्या. आता साल तुटणार नाही, याची काळजी घेत अलगदपणे आतील फोडी बाहेर काढा. संत्र्याचं गोलाकार साल चेंडूप्रमाणे अखंड राहायला हवं. संत्र्याची ही साल फ्रीजरमध्ये थंड होण्याकरिता ठेवून द्या.
संत्र्याचा गर काढून कुस्करून घ्या. दूध उकळवून त्यात साखर एकत्र करा. नंतर आच बंद करून दूध थंड होऊ द्या. थंड दुधामध्ये संत्र्याचा गर आणि ऑरेंज इसेन्स एकत्र करून फ्रीजरमध्ये गोठण्यासाठी ठेवून द्या. गोठल्यानंतर फ्रीजमधून बाहेर काढून त्यात क्रीम एकत्र करून एकदा मिक्सरमधून फिरवून घ्या. हे मिश्रण संत्र्याच्या सालीमध्ये भरून त्यावर मनुका आणि डाळिंबाचे दाणे घाला. वरून संत्र्याच्या सालाची चकती ठेवून ते बंद करा. ही संत्री पुन्हा फ्रीजरमध्ये गोठण्यासाठी ठेवून द्या. ऑरेंज बॉल्स थंडगार सर्व्ह करा.