दुधाची रबडी (Sunday Feast : Dry Fruit Milk Rabdi)

दुधाची रबडी (Sunday Feast : Dry Fruit Milk Rabdi)

दुधाची रबडीसाहित्य :
1 लीटर दूध, अर्धा टीस्पून वेलची पूड, 1 कप साखर, थोडा बारीक केलेला सुकामेवा.

कृती : दूध उकळवून घ्या. नंतर आच मंद करून दूध पाव भाग शिल्लक राहील इतपत आटवून घ्या. त्यानंतर त्यात साखर आणि वेलची पूड एकत्र करा आणि 5 मिनिटं अजून उकळवा. नंतर आचेवरून उतरवून थंड होऊ द्या. थंडगार रबडी सुकामेव्याचे तुकडे घालून सर्व्ह करा.