लिची शॉट्स आणि समर स्पेशल ड्रिंक (Summer Specia...

लिची शॉट्स आणि समर स्पेशल ड्रिंक (Summer Special Drink)

लिची शॉट्स
साहित्य : 15 लिचीचा गर, 1 टीस्पून लिंबाचा रस, 1 टेबलस्पून साखर, 2-3 बर्फाचे तुकडे.
कृती : मिक्सरमध्ये लिचीचा गर आणि साखर एकत्र बारीक वाटून घ्या. त्यात 1 ग्लास थंड पाणी मिसळून पुन्हा ब्लेंड करा. हे मिश्रण गाळून सर्व्हिंग ग्लासमध्ये भरा. त्यात लिंबाचा रस आणि बर्फाचे तुकडे घालून थंडगार सर्व्ह करा.

समर स्पेशल ड्रिंक
साहित्य : 200 मिलिलीटर टोमॅटोचा रस, 100 मिलिलीटर सोडा वॉटर, 1 टीस्पून आल्याचा रस, स्वादानुसार सेंधव मीठ आणि काळी मिरी पूड, 4-5 तुळशीची पानं.
कृती : ब्लेंडरमध्ये टोमॅटोचा रस, आल्याचा रस, काळी मिरी पूड, सेंधव मीठ आणि तुळशीची 1-2 पानं घालून बारीक वाटून घ्या. हे मिश्रण गाळून घ्या. आता सर्व्हिंग ग्लासमध्ये अर्धा ग्लास टोमॅटो-आल्याचं मिश्रण घाला. नंतर सोडा वॉटर घालून उर्वरित ग्लास भरा. उर्वरित तुळशीच्या पानांनी सजावट करा आणि सर्व्ह करा.