आवळा व गव्हांकूर सरबत (Summer Special : Aamla A...

आवळा व गव्हांकूर सरबत (Summer Special : Aamla And Wheat Grass Juice)

आवळा व गव्हांकूर सरबत

साहित्य : अर्धा वाटी आवळ्याचे तुकडे, 1 वाटी गव्हांकुराची धुऊन चिरलेली कोवळी पाती, 1 वाटी साखर, 2 टीस्पून पुदिन्याची बारीक चिरलेली पानं, चिमूटभर मिरेपूड, चवीनुसार मीठ, थोडा बर्फ.

कृती : आवळ्याचे तुकडे आणि गव्हांकुराच्या पाती यामध्ये थोडं-थोडं पाणी घालून मिक्सरमधून वेगवेगळं मऊशार वाटण तयार करून घ्या. एका बाऊलमध्ये दोन्ही पेस्ट गाळणीने गाळून त्यात मीठ, साखर आणि पाणी (अंदाजाने कमीत कमी 4 ग्लास) घालून चमच्याने ढवळून घ्या. एका ग्लासमध्ये सरबत घालून वरून मिरेपूड, पुदिन्याची बारीक चिरलेली पानं आणि बर्फाचे वेगवेगळ्या आकारातील क्यूब्स घाला आणि सर्व्ह करा.

लाभ : उन्हाळ्यामुळे पित्त वाढल्यास हे सरबत दिवसभर थोडं थोडं प्यावं, हमखास फायदा होतो.