उसाच्या रसातले लाडू (Sugarcane Juice Laddu)

उसाच्या रसातले लाडू (Sugarcane Juice Laddu)

उसाच्या रसातले लाडू

साहित्य : 1 ग्लास उसाचा रस, 1 वाटी तांदळाचा रवा, 1 वाटी नारळाचं घट्ट दूध, 1 चमचा वेलची पूड.

कृती :
तांदूळ तीन-चार तास भिजत ठेवा. नंतर निथळून तासभर तसेच ठेवा. आता या तांदळाचा जाडसर रवा वाटून घ्या. हा रवा तांबूस रंगावर भाजून घ्या.
थंड झाल्यावर त्यात नारळाचं दूध घालून मिश्रण तयार करा. उसाचा रस उकळून थोडा दाटसर करून घ्या. त्यात तांदळाच्या रव्याचं मिश्रण घालून सतत ढवळत राहा. मिश्रणाच्या गुठळ्या होणार नाहीत, याची काळजी घ्या. लाडू वळण्याइतपत मिश्रण दाट झालं की, त्याचे लाडू वळून घ्या.