स्टफ्ड टिक्की (Stuffed Tikki)

स्टफ्ड टिक्की (Stuffed Tikki)

स्टफ्ड टिक्की


साहित्य : 2 वाटी बासमती पोहे, 1 वाटी बटाट्याचा कीस, अर्धा वाटी आलं-लसूण-मिरची-कोथिंबीर यांचं वाटण, स्वादानुसार मीठ, अर्धा वाटी तीळ, अर्धा वाटी ओलं खोबरं, अर्धा वाटी तेल, 2 टीस्पून लिंबाचा रस.

कृती : पोहे स्वच्छ धुऊन, पाण्यातून काढून चाळणीवर निथळत ठेवा. एका परातीमध्ये पोहे, बटाट्याचा कीस, लिंबाचा रस आणि मीठ घालून व्यवस्थित मळून घ्या. एका पॅनमध्ये चमचाभर तेल गरम करून, त्यात तीळ, ओलं खोबरं, मीठ आणि आलं-लसणाचं वाटण घालून चांगलं परता. मिश्रण व्यवस्थित एकजीव झालं की, आचेवरून खाली उतरवा. आता पोह्याच्या मिश्रणामध्ये तीळ-खोबर्‍याचं मिश्रण स्टफ करून आवडीच्या आकाराची टिक्की तयार करा. नॉनस्टिक पॅनमध्ये गरम तेलावर शॅलो फ्राय करून घ्या. गरमागरम स्टफ्ड टिक्की सॉस आणि हिरव्या चटणीसोबत सर्व्ह करा.