स्टफ पपई विथ पनीर (Stuffed Papayya With Paneer)

स्टफ पपई विथ पनीर (Stuffed Papayya With Paneer)

स्टफ पपई विथ पनीर

साहित्य : 1 लांबट आकाराची पिकलेली पपई, 1 वाटी पनीर, 1 चमचा खवा, 1 वाटी मटार, थोडी लसणीची पात व कोथिंबीर बारीक चिरलेली, अर्धा वाटी आलं-लसूण, मिरच्या व मीठ यांची पेस्ट, पाव वाटी बारीक चिरलेला कांदा, पाव वाटी बारीक चिरलेला टोमॅटो, फोडणीचं साहित्य, मीठ व लोणी.

कृती : पपईची साल काढून टाका. नंतर ती मधोमध कापून आतील बिया आणि रेषा काढून टाका. एका खोलगट कढईत लोणी घालून त्यावर ही पपई लालसर परतवा.
एका पॅनमध्ये तेल गरम करून त्यात कांदा, टोमॅटो आणि हिरवी पेस्ट परतवा. मिश्रणाचा रंग बदलल्यावर त्यात मटार, पनीर आणि खवा घाला. पाणी न घालता या मिश्रणाची एक वाफ काढा. नंतर मीठ घालून शिजवा. हे सारण शिजल्यानंतर गरम असतानाच पपईच्या खोलगट भागामध्ये भरा. पपईचे दोन्ही तुकडे टुथपिकच्या साहाय्याने एकत्र करा. एका खोलगट कढईत तुपाची फोडणी करून, त्यावर ही पपई परतवा. पाच मिनिटं झाकण ठेवून, शिजल्यानंतर गरमागरम सर्व्ह करा.