भरलेली कारली (Stuffed Karela)

भरलेली कारली (Stuffed Karela)

भरलेली कारली


साहित्यः 250 ग्रॅम कारली, 100 ग्रॅम बेसन, तेल, एक लिंबू, 4-5 टीस्पून साखर, मीठ, हळद, धणे पूड, लाल मिरची पूड.

कृतीः कारली सोलून मीठ व हळद लावून उकडून घ्या. कारले उकडल्यावर पाणी गाळून घ्या. कढईत तेल गरम करा. बेसनात मीठ, हळद, साखर, मिरची, कोथिंबीर मिक्स करा. तेलावर परता. 2-4 मिनिटे परतून लिंबाचा रस टाका. तयार मसाला करल्यामध्ये भरून तेलावर खरपूस परतून घ्या. गरम-गरम सर्व्ह करा.