वरईचे स्टफ्ड दही वडे (Stuffed Dahi Vada)

वरईचे स्टफ्ड दही वडे (Stuffed Dahi Vada)

वरईचे स्टफ्ड दही वडेसाहित्य :
वड्यांसाठी : अर्धा कप वरई, 1 उकडलेला बटाटा, 2 टीस्पून राजगिर्‍याचं पीठ, 1 टीस्पून आलं-हिरवी मिरची पेस्ट, स्वादानुसार सैंधव, तळण्यासाठी तेल.

सारणासाठी : अर्धा कप बारीक चिरलेली कोथिंबीर, पाव कप खोबरं, थोडी काजूची पूड, स्वादानुसार काळी मिरी पूड, साखर व सैंधव.

गार्निशिंगसाठी : 2 कप ताजं दही, खजुराची गोड चटणी, 1 टीस्पून जिरे पूड, स्वादानुसार सैंधव.

कृती : वरई वाफेवर शिजवून घ्या. त्यात कुस्करलेला बटाटा, राजगिर्‍याचं पीठ, सैंधव आणि हिरवी मिरची-आल्याची पेस्ट घालून व्यवस्थित मळून घ्या. या पिठाचे लहान-लहान गोळे तयार करून घ्या. खोबरं, कोथिंबीर, काजू पूड, सैंधव आणि साखर यांचं एकजीव मिश्रण तयार करून घ्या. वरईच्या गोळीची वाटी तयार करून त्यात हे मिश्रण भरा आणि गोळी बंद करून गोलाकार करून घ्या. गरम तेलामध्ये हे वडे सोनेरी रंगावर तळून घ्या. दह्यामध्ये साखर घालून चांगलं फेटून घ्या. सर्व्हिंग डिशमध्ये सर्वप्रथम गरमागरम वडे ठेवा. त्यावर दही, जिरे पूड, सैंधव, खजुराची चटणी आणि कोथिंबीर घाला आणि सर्व्ह करा.