स्ट्रॉबेरी पुडिंग (Strawberry Pudding)

स्ट्रॉबेरी पुडिंग (Strawberry Pudding)

स्ट्रॉबेरी पुडिंग

साहित्य : 2 कप लो फॅट्स दूध, पाऊण कप पेक्षा कमी साखर, 12 ताज्या स्ट्रॉबेरी, स्ट्रॉबेरी इसेन्स, 10 ग्रॅम चायना ग्रास पाऊण कप कोमट पाण्यात 5 मिनिटं भिजवून ठेवा.

कृती:  एका भांड्यामध्ये दूध गरम करत ठेवा. गॅस बंद करून त्यात साखर घाला व विरघळू द्या. तोपर्यंत भिजत ठेवलेले चायना ग्रास गरम करा. चायना ग्रास पाण्यात पूर्ण विरघळल्यावर मिश्रण थोडं दाट होईल मग गॅस बंद करा. हे मिश्रण दुधात घालून चांगलं ढवळा व मध्यम आचेवर ठेवा. ताज्या स्ट्रॉबेरीजची सालं काढून त्याची पेस्ट करून घ्या व ती त्या दुधात घाला. स्ट्रॉबेरी इसेन्स घाला व 1 मिनिट चांगलं ढवळा. नंतर गॅस बंद करा. हे मिश्रण एका पुडिंग बाऊलमध्ये काढून थंड होऊन सेट होऊ द्या. (रूम टेम्परेचरला येऊ द्या.) मग त्यावर प्लॅस्टिक झाकण लावून फ्रिजमध्ये 2 तास थंड होण्यास ठेवा. सर्व्ह करण्यापूर्वी बाऊल कोमट पाण्यात ठेवा आणि सर्व्हिंग प्लेटमध्ये पालथे करा. मग त्यावर स्ट्रॉबेरी लावून सजवा किंवा त्यावर चॉकलेट सिरप घाला.
टीप : स्ट्रॉबेरी आंबट असल्यास साखरेचं प्रमाण वाढवू शकता.