स्टिर फ्राइड चिली चिकन (Stir Fried Chilly Chicken)

स्टिर फ्राइड चिली चिकन (Stir Fried Chilly Chicken)

स्टिर फ्राइड चिली चिकन


साहित्य : 2-3 टेबलस्पून तेल, 4 लसणाच्या पाकळ्या बारीक चिरलेल्या, 3-4 हिरव्या मिरच्या बारीक चिरलेल्या, 1 कप चिकनचे लहान तुकडे, 2 टीस्पून चिली सॉस,
4 टीस्पून टोमॅटो प्युरी, थोडा सोया सॉस, 1 टीस्पून साखर, 7-8 तुळशीची पानं.

कृती : एका पॅनमध्ये तेल गरम करत ठेवा. त्यात लसूण, मिरच्या परतवून घ्या. नंतर त्यात चिकनचे तुकडे घालून परतवा आणि मिनिटभर शिजू द्या. त्यात स्वादानुसार मीठ घालून परतवा. चिकन शिजत आलं की, त्यात चिली सॉस, टोमॅटो प्युरी, सोया सॉस आणि साखर घाला. सॉस दाट होईपर्यंत शिजवा. नंतर त्यात तुळशीची पानं घालून, गरमागरम सर्व्ह करा.