स्प्राऊट्स सूप (Sprouts Soup)

स्प्राऊट्स सूप (Sprouts Soup)

स्प्राऊट्स सूप

साहित्य : 250 ग्रॅम मोड आलेले मूग, 1 कांदा चिरलेला, 2-3 लसणाच्या पाकळ्या, 2 लवंगा, 2 दालचिनीच्या काड्या, 1 टेबलस्पून चाट मसाला, 1 टेबलस्पून चिली व्हिनेगर, स्वादानुसार मीठ, स्वादानुसार काळी मिरी पूड, 50 ग्रॅम पनीरचे लहान चौकोनी तुकडे.

कृती :
प्रेशर कुकरमध्ये मूग, कांदा, लसूण, लवंगा, दालचिनी आणि 3 कप पाणी घालून तीन-चार शिट्या करून घ्या. आच बंद करून कुकर थंड झाल्यावर मुगाचं मिश्रण मिक्सरमधून बारीक वाटून घ्या. हे मिश्रण गाळून पुन्हा पॅनमध्ये गरम करत ठेवा. त्यात चाट मसाला, चिली व्हिनेगर, मीठ आणि काळी मिरी पूड घालून मंद आचेवर दोन-तीन मिनिटं शिजवा. नंतर त्यात पनीरचे तुकडे घालून स्प्राऊट्स सूप गरमागरम सर्व्ह करा.