स्प्राउट स्टर फ्राय (Spouse Star Fry)

स्प्राउट स्टर फ्राय (Spouse Star Fry)

स्प्राउट स्टर फ्राय

साहित्यः 1 कप मोड आलेले मूग, प्रत्येकी 1 लाल, पिवळी, हिरवी सिमला मिरची, 1 कांदा, 2 टोमॅटो, 1 टीस्पून बटर, मीठ व काळीमिरी पूड चवीनुसार, 1 टीस्पून आलं व हिरव्या मिरचीची पेस्ट, अर्धा टीस्पून ऑरेगॅनो, लिंबाचा रस, सजावटीसाठी बारीक चिरलेली कोथिंबिर.

कृतीः सर्व भाज्या पातळ व उभ्या चिरून घ्या. एका कढईत बटर घालून आलं मिरचीची पेस्ट टाकून त्यावर कांदा मोठ्या आचेवर परतून घ्या. मूग, व इतर भाज्या घालून 2-3 मिनिटे शिजवा. लिंबाचा रस, मीठ व इतर मसाले घाला. कोथिंबिरीने सजवून गरमागरम सर्व्ह करा.