तिखटाचा सांजा (Spicy Sheera)

तिखटाचा सांजा (Spicy Sheera)

तिखटाचा सांजा

साहित्य : 1 वाटी बारीक रवा, अर्धा वाटी बारीक चिरलेला कांदा, 2 टेबलस्पून मूग डाळ, पाव वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर,फोडणीचं साहित्य, स्वादानुसार लाल मिरची पूड, स्वादानुसार मीठ, 4 टेबलस्पून तेल.
कृती : एका पॅनमध्ये मंद आचेवर रवा खमंग भाजून घ्या. भाजलेला रवा बाजूला काढून ठेवून, त्याच कढईत तेल गरम करत ठेवा. त्यात कांदा परतवा. नंतर मूग डाळ घालून हिंग, हळद, मोहरी आणि लाल मिरची पूड यांची फोडणी करा. त्यावर भाजलेला रवा घालून परतवा आणि त्यात 2 वाट्या पाणी व मीठ एकत्र करा. मिश्रणाला एक वाफ येऊ द्या. नंतर कोथिंबीर घालून गरमागरम तिखटाचा सांजा सर्व्ह करा.
टीप ः तिखटाचा सांजा महालक्ष्मीला विशेष प्रिय आहे.