मटार मसाला (Spicy Peas)

मटार मसाला (Spicy Peas)

मटार मसाला

साहित्यः 2 कप मटार, प्रत्येकी 2 मध्यम आकाराचे बारीक चिरलेले कांदे, टोमॅटो, हिरवी मिरची, अर्धा इंच आले, अर्धा टीस्पून जिरे, अर्धा इंच किसलेले आलं, पाव टीस्पून हळद, अर्धा टीस्पून लाल मिरची पूड, अर्धा टीस्पून गरम मसाला, मीठ चवीनुसार, प्रत्येकी
1 टीस्पून तेल व तूप.

कृतीः पॅनमध्ये तेल व तूप गरम करून जिर्‍याची फोडणी द्या. कांदा टाकून खरपूस परता. आलं व हिरवी मिरची टाका. टोमॅटो घालून शिजवा. एक कप पाणी घालून उकळी येऊ द्या. उकडलेले मटार, मीठ, हळद, लाल मिरची पूड व गरम मसाला टाकून मंद आचेवर शिजवा. कोथिंबिरीने सजवून सर्व्ह करा.