स्पायसी पराठा (Spicy Paratha)

स्पायसी पराठा (Spicy Paratha)

स्पायसी पराठा

साहित्य : 1 वाटी गव्हाचं, 1 वाटी तांदळाचं पीठ, 1 वाटी मैदा, 2 चमचे बेसन, 5-6 संकेश्‍वरी मिरच्या, 5-6 हिरव्या मिरच्या, 1 चमचा ओवा, 1 चमचा जिरं, 1 चमचा तीळ, चवीनुसार मीठ आणि तेल.

कृती : तीनही पीठं एकत्र चाळून घ्या. दोन्ही प्रकारच्या मिरच्या बारीक चिरून घ्या. लोखंडी तव्यावर तेल गरम करून त्यावर मिरच्या, ओवा, तीळ आणि जिरं परतवा आणि हे तेल लगेचच कणकेत घाला. त्यात पाणी घालून कणीक मळा. हे कणीक दहा मिनिटं झाकून ठेवा. नंतर त्याचे जाडसर पराठे लाटा आणि थोड्या तेलावर शेकून घ्या. स्पायसी पराठे गरमागरम सर्व्ह करा.