पपईचा ठसका (Spicy Papaya Recipe)

पपईचा ठसका (Spicy Papaya Recipe)

पपईचा ठसका

पपईचा ठसका, Spicy Papaya Recipe
साहित्य : 1 कच्ची हिरवी पपई, 1 चमचा आमचूर पावडर, फोडणीचं साहित्य (मोहरी, हिंग व हळद), 10 हिरव्या मिरच्या, 3 हिरव्या लसणीच्या पाती, चिमूटभर हळद, चवीनुसार मीठ, 2-3 चमचे तेल.
कृती : पपई हिरव्या सालासकट किसून घ्या. पपईच्या किसामध्ये मीठ आणि आमचूर पावडर एकत्र करा. फोडणीच्या भांड्यात तेल गरम करून, त्यात भरपूर मोहरी, हिंग आणि चिमूटभर हळद घाला. मिरचीची देठं तशीच ठेवून, त्यास मधून चिर द्या आणि तेलात गडद रंग होईपर्यंत तळा. ही फोडणी गरम असतानाच पपईच्या किसावर घाला आणि मिश्रण एकजीव करा.

पनीर टिक्का मसाला (Paneer Tikka Masala)