स्पायसी पनीर भजी, कैरीची भजी (Spicy Paneer And ...

स्पायसी पनीर भजी, कैरीची भजी (Spicy Paneer And Raw Mango Bhajiya)

स्पायसी पनीर भजी

साहित्य : 250 ग्रॅम चौकोनी आकाराचे पनीरचे तुकडे, तळण्यासाठी तेल.
मॅरिनेशनसाठी : 1 टीस्पून लिंबाचा रस, 2 टीस्पून आलं-लसणाची पेस्ट, अर्धा टीस्पून हळद पूड, अर्धा टीस्पून लाल मिरची पूड, स्वादानुसार मीठ.
घोळ तयार करण्यासाठी : पाऊण कप बेसन, 2 टेबलस्पून तांदळाचं पीठ, अर्धा टीस्पून लाल मिरची पूड, अर्धा टीस्पून जिरं पूड, अर्धा टीस्पून गरम मसाला पूड, अर्धा टीस्पून ओवा, अर्धा टीस्पून लसणाची पेस्ट, स्वादानुसार मीठ, अर्धा कप पाणी.
कृती : मॅरिनेशनसाठीचं सर्व साहित्य चांगलं एकजीव करून पनीरच्या तुकड्यांना चोळा आणि अर्धा तास मॅरिनेट होण्यासाठी ठेवून द्या. एका वाडग्यात घोळ तयार करण्यासाठीचं सर्व साहित्य एकजीव करून ठेवा.
आता कढईत तळण्यासाठी तेल गरम करून घ्या. पनीरचे तुकडे पिठाच्या मिश्रणात घोळून गरम तेलात सोनेरी रंगावर तळून घ्या. नंतर टिश्यू पेपरवर काढून जास्तीचं तेल निथळू द्या. गरमागरम मालवणी स्टाइल पनीर भजी हिरवी चटणी आणि टोमॅटो सॉससोबत सर्व्ह करा.

कैरीची भजी

साहित्य : 1 कप तांदळाचं पीठ, पाऊण कप बेसन, 1 कैरी किसलेली, अर्धा कप बारीक चिरलेला कांदा, अर्धा कप बारीक चिरलेली कांद्याची पात, 2 टेबलस्पून बारीक चिरलेली कोथिंबीर, अर्धा टीस्पून चाट मसाला, थोडे कढीपत्ते, थोडी पुदिन्याची पानं, 2 टीस्पून आलं-लसूण पेस्ट, अर्धा टीस्पून जिरं पूड, 2 हिरव्या मिरच्या बारीक चिरलेल्या, चिमूटभर खायचा सोडा, पाव टीस्पून ओवा, स्वादानुसार मीठ, तळण्यासाठी तेल.
कृती : तेलाव्यतिरिक्त उर्वरित सर्व साहित्य एका मोठ्या वाडग्यात घेऊन चांगलं एकजीव करून घ्या. त्यात आवश्यकतेनुसार पाणी मिसळून दाट मिश्रण तयार करा.
कढईत तळण्यासाठी तेल गरम करत ठेवा. त्यात मध्यम आकाराच्या भजी कुरकुरीत आणि सोनेरी रंगाच्या होईपर्यंत तळा. नंतर टिश्यू पेपरवर काढून जास्तीचं तेल निथळू द्या. गरमागरम कैरीची भजी हिरव्या चटणीसोबत सर्व्ह करा.