शेवग्याची भाजी (Spicy Drumsticks Preparation)

शेवग्याची भाजी (Spicy Drumsticks Preparation)

शेवग्याची भाजी

साहित्य : 1 वाटी शेवग्याची पानं, अर्धा वाटी भिजवलेली चणा डाळ, 2 बारीक चिरलेले कांदे, 4-5 हिरव्या मिरच्या, 4-5 लसणाच्या पाकळ्या, अर्धा टीस्पून जिरं, चिमूटभर हिंग, पाव टीस्पून हळद, 4 टीस्पून तेल, स्वादानुसार मीठ.
कृती : शेवग्याची पानं स्वच्छ धुऊन कोरडी करा आणि बारीक चिरा. चण्याची डाळ गरम पाण्यात भिजवा. जिरं, लसूण आणि मिरच्या खलबत्त्यात बारीक कुटून घ्या. कढईत तेल गरम करून, त्यावर कांदा, जिरं-लसूण-मिरचीचं वाटण, हिंग आणि हळद परतवा. त्यात चण्याची डाळ घालून मिश्रण खमंग परतवा. आता त्यात शेवग्याची पानं आणि मीठ घालून भाजी चांगली परतवा. झाकण ठेवून शिजवा. गरमागरम शेवग्याच्या पानांची भाजी, नाचणीच्या भाकरीसोबत सर्व्ह करा.
टीप : शेवग्याची भाजी ज्येष्ठा गौरी आणि श्रीकृष्णालाही विशेष प्रिय आहे.