स्पायसी कॉर्न व्हेजिटेबल (Spicy Corn Vegetable)

स्पायसी कॉर्न व्हेजिटेबल (Spicy Corn Vegetable)

साहित्य : अर्धा कप उकडलेले मक्याचे दाणे, अर्धा कप पनीरचे तुकडे, अर्धा टीस्पून जिरे, अर्धा टीस्पून चाट मसाला, अर्धा टीस्पून गरम मसाला, 1 टेबलस्पून तेल, 1 टेबलस्पून आलं-लसूण-हिरव्या मिरचीची पेस्ट, 1 टेबलस्पून अख्खा गरम मसाला (दालचिनी, लवंग, मोठी वेलची, काळी मिरी), 1 बारीक चिरलेला कांदा, 1 बारीक चिरलेली सिमला मिरची, 1 बारीक चिरलेला टोमॅटो, 1 टीस्पून लाल मिरची पूड, स्वादानुसार मीठ.
कृती : पॅनमध्ये तेल गरम करून त्यात जिरे, आलं-लसूण-मिरचीची पेस्ट परतवा. नंतर गरम मसाले घालून मिश्रणाला तेल सुटेपर्यंत परतवा. त्यात उर्वरित सर्व साहित्य घालून शिजवा. गरमागरम कॉर्न व्हेजिटेबल चपातीसोबत सर्व्ह करा.