ओल्या काजूची उसळ (Spicy Cashew Curry)

ओल्या काजूची उसळ (Spicy Cashew Curry)

साहित्य : पाव किलो ओले काजू, 2 टेबलस्पून खोबरं, पाव कप कोथिंबीर, 1 टीस्पून लाल मिरची पूड, 2 टीस्पून तेल, अर्धा टीस्पून मोहरी, पाव टीस्पून हिंग, पाव टीस्पून हळद, 1 टीस्पून चिंचेचा घट्ट कोळ, 2 टीस्पून किसलेला गूळ, स्वादानुसार मीठ.
कृती : ओले काजू स्वच्छ करून व्यवस्थित धुऊन घ्या. खोबरं आणि कोथिंबिरीमध्ये दोन-तीन टेबलस्पून पाणी मिसळून बारीक वाटण करून घ्या. कढईत तेल गरम करून, त्यात मोहरी, हिंग आणि हळदीची फोडणी करा. मोहरी तडतडली की, त्यात काजू, मीठ आणि लाल मिरची पूड मिसळा. मंद आचेवर झाकण ठेवून पाच मिनिटांकरिता काजू शिजू द्या. अधूनमधून मिश्रण ढवळत राहा. नंतर त्यात खोबरं-कोथिंबिरीचं वाटण आणि चिंचेचा कोळ मिसळा. साधारण दोन मिनिटं मिश्रण परतवून त्यात पाणी घाला आणि काजू पूर्णतः शिजवून घ्या. नंतर त्यात गूळ घालून, ते विरघळेपर्यंत दोन-तीन मिनिटं मंद आचेवर उकळी काढा. मिश्रण चांगलं एकजीव करून आच बंद करा. गरमागरम ओल्या काजूची उसळ चपाती किंवा भाकरीसोबत सर्व्ह करा.
टीप :
–    सुके काजू वापरत असाल, तर ते कोमट पाण्यात 8 ते 10 तास भिजत ठेवून वापरा.

ओल्या काजूची उसळ, Spicy Cashew Curry

डाळिंबी उसळ (Special Maharashtrian Curry)