आंध्र चिकन पुलाव (Spicy Andhra Chicken Pulav)

आंध्र चिकन पुलाव (Spicy Andhra Chicken Pulav)

आंध्र चिकन पुलावसाहित्य :
पाव किलो चिकन, 3 कप बासमती तांदूळ (30 मिनिटं भिजवलेले), 2 मध्यम आकाराचे कांदे, 2 हिरव्या मिरच्या, 1 टेबलस्पून लिंबाचा रस, पाव टीस्पून हळद, 3 कप नारळाचं दूध, 2 कप चिकन स्टॉक, स्वादानुसार मीठ, 4 लवंगा, अर्धा इंच दालचिनी, 20 कडीपत्त्याची पानं, 1 टेबलस्पून तूप,  4 टेबलस्पून तेल, 1 टेबलस्पून चिरलेली कोथिंबीर.
वाटणासाठी : 2 सुक्या लाल मिरच्या, 1 टेबलस्पून आलं-लसूण पेस्ट, पाणी.
कृती : सर्वप्रथम वाटणाचं साहित्य एकत्र बारीक वाटून बाजूला ठेवा. चिकनला हळद लावून 10 मिनिटं मॅरिनेट करत ठेवा. नंतर धुऊन घ्या. जाड बुडाच्या पातेल्यामध्ये तेल गरम करून त्यात लवंगा, दालचिनी, वेलची आणि कडिपत्ता परतवा. नंतर त्यात चिरलेला कांदा आणि हिरवी मिरची घाला. ते तेलावर चांगले परतून घ्या. त्यात वाटण घालून चांगलं परतून घ्या. आता त्यामध्ये नारळाचं दूध आणि चिकन स्टॉक घाला. उकळी येऊ लागली की, त्यात तांदूळ, मीठ आणि लिंबाचा रस घाला. हे सर्व व्यवस्थित एकत्र करून त्यावर झाकण ठेवून मंद आचेवर 10 ते 15 मिनिटं शिजू द्या. नंतर त्यावर चिरलेली कोथिंबीर घालून आंध्र चिकन पुलाव गरमागरम सर्व्ह करा.