पनीर फ्रुट सॅलड (Special Sweet Paneer Recipe)

पनीर फ्रुट सॅलड (Special Sweet Paneer Recipe)

पनीर फ्रुट सॅलड, Special Sweet Paneer Recipe
साहित्य : १ वाटी चौकोनी तुकडे केलेले पनीर, १ वाटी आंब्याच्या फोडी, १ वाटी पपईच्या फोडी , १ वाटी केळ्याचे काप, १वाटी सफरचंदाच्या फोडी, अर्धा कामाचा वेलची पूड, अर्धा चमचा दुधाचा मसाला, ३ चमचे घट्ट गोड दही.
कृती: पनीर आणि सर्व फळं एकत्र करा. दह्यामध्ये दुधाचा मसाला आणि वेलची पूड घालून चांगलं फेटा . एका बाउलमध्ये सर्वप्रथम पनीर आणि फळांच्या फोडी घाला. त्यावर फेटलेलं दही घाला. हा बाउल १० ते १५ मिनिटांसाठी डीप फ्रिज करा. पनीर फ्रुट सॅलेड थंडगार सर्व करा.

अ‍ॅपल चमचम (Fruit Recipe: Apple Chamcham)