केशर पेढा (Special Offerings Kesar Pedha)

केशर पेढा (Special Offerings Kesar Pedha)

केशर पेढा – Kesar Pedha

Kesar Pedha

साहित्य : 2 लीटर दूध, पाव टीस्पून तुरटीची पूड, दीड कप पिठीसाखर, 1 टीस्पून वेलची पूड, 1 टीस्पून केशर भाजून कुस्करलेलं, 1 चिमूट खायचा पिवळा रंग, सजावटीसाठी
थोडे बदाम-पिस्त्याचे काप.

कृती : जाड बुडाच्या भांड्यात दूध गरम करत ठेवा. साधारण 20-25 मिनिटांत ते आटून एक चतुर्थांश राहील. आता त्यात तुरटीची पूड मिसळून मावा तयार होईपर्यंत शिजवा. मावा तयार झाल्यानंतर, तो पूर्णतः थंड होऊ द्या. यासाठी साधारण एक-दोन तास लागतील. नंतर त्यात पिठीसाखर, वेलची पूड, केशर आणि पिवळा रंग घालून व्यवस्थित एकजीव करा. या मिश्रणाचे पेढे तयार करून घ्या. त्यावर बदाम-पिस्त्याचे काप लावून सर्व्ह करा.
टीप : हे केशर पेढे तीन-चार दिवस चांगले टिकतात.