डाळिंबी उसळ (Special Maharashtrian Curry)

डाळिंबी उसळ (Special Maharashtrian Curry)

डाळिंबी उसळ

डाळिंबी उसळ, Special Maharashtrian Curry
साहित्य : 2 वाट्या डाळिंबाचे दाणे, 1 वाटी ओलं खोबरं, 1 वाटी टोमॅटोचे तुकडे, 1 चमचा जिरं, 1 चमचा लाल मसाला, 2 लाल मिरच्या, थोडी कढीपत्त्याची पानं, 1 चमचा गरम मसाला, 1 गुळाचा खडा, 1 चमचा धणे-जिरं पूड, 2 चमचे कोकम आगळ, चवीनुसार मीठ, थोडी बारीक चिरलेली कोथिंबीर.
कृती : तव्यावर चमचाभर तेल गरम करा.
त्यात मिरच्या, खोबरं आणि टोमॅटो घालून लालसर होईपर्यंत परतवा. त्यात मीठ घालून बारीक वाटून घ्या.
एका कढईत तेलाची फोडणी करा. त्यात वाटण, लाल मसाला, धणे-जिरं पूड, कढपत्त्याची पानं आणि गरम मसाला घालून परतवा. त्यात एक वाटी पाणी, गूळ व मीठ घाला आणि मिश्रणाला एक उकळी आणा. नंतर त्यात डाळिंबाचे दाणे व कोथिंबीर घालून मंद आचेवर पाच मिनिटं ठेवा. सर्वांत शेवटी उसळीत आगळ एकत्र करा.

श्रावण स्पेशल: कूल स्ट्रॉबेरी सूप (Cool Strawberry Soup)